राखीला ४ आठवड्यात शरण येण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली- वादग्रस्त सेलिब्रिटी राखी सावंत हिला सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे.मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार चार आठवड्यात शरण येण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.तसेच राखी सावंतने जामीनासाठी दाखल केलेली याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.राखी सावंतचा माजी पती आदिल दुर्रानी याचा अश्लील व्हिडिओ लिक केल्याप्रकरणी राखी सावंत वर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या काही महिन्यांपासून राखी सावंत दुबईमध्ये वास्तव्यास आहे.राखीचा माजी पती आदिल दुर्रानी याने तिच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याने ती भारताबाहेर रहात आहे.राखीने आपले काही खासगी व्हिडीओ लीक केले असा आरोप आदिलने केला होता. याच आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर राखी अटक टाळण्यासाठी दुबईला पळून गेली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर राखीने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.आदिलच्या तक्रारीनंतर राखी सावंतवर भारतीय दंड संहिता कलम ५०० अन्वये आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने अश्लील व्हिडिओ प्रकाशित केल्याच्या कलम ३४ अंतर्गत मानहानीचा गुन्हाही दाखल करण्यात आला .त्यानंतर तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
मात्र,आता सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अर्ज फेटाळून लावल्याने राखीच्या अडचणी वाढल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top