मुंबई- आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाला मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश दिले असून उद्या त्यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालय निर्णय घेणार आहे. सळवींच्या पत्नी आणि मुलाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती, तर राजन साळवीबअटकपूर्व जामीन न घेण्यावर ठाम आहेत.