राजौरीत दहशतवाद्यांच्या चकमकीत 2 जवान शहीद

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या राजौरीत आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाला, तर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजौरीतील धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच शोध मोहिम राबविण्यात आली. लष्कार आणि जम्मू आणि काश्मिर पोलिसांच्या संयुक्त दलांवर दहशतवाद्यांनी अंदाघूद गोळीबार केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. दरम्यान, श्रीनगरमध्ये आज सकाळी लष्कराच्या जवानांनी लष्कर-ए-तौयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्या 2 पिस्तूल, 4 मॅगझिन, 2 फिलर मॅगझिन आण ग्रेनेड जप्त करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top