राम मंदिरासाठी २४ हजार किलोची घंटा

अयोध्या :

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी खास २४ हजार किलोची घंटा बनविण्यात आली आहे. यामध्ये ८ धातूंचा वापर करण्यात आला आहे. उद्योगपती आदित्य मित्तल यांनी ही घंटा दान केली आहे.

सोने, चांदी, जस्त, कथिल, पारा, तांबे, लोखंड आदी विविध ८ धातूंचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. ही देशातील सर्वात मोठी घंटा आहे. हा घंटानाद २ किलोमीटरपर्यंत घुमणार आहे. इटाह येथील ३० कारागिरांनी ही घंटा तयार केली आहे. रेल्वेतून ही घंटा मंगळवारी रात्री अयोध्येला आणण्यात आली. उपविभागीय कार्यालयातून ही घंटा वाहनातून अयोध्येत आणण्यात आली. वाहनावरील घंटा पाहून भाविक चकित झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top