राहुल गांधींची उद्या सोलापुरात जाहीर सभा

सोलापूर

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी स्वत: सोलापुरात येणार आहेत. २४ एप्रिलला सोलापुरात राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते अशी लढत होणार आहे. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सोलापुरात सभा घेणार आहेत. सोलापुरातील मरिआई चौकातील एक्झिब्युशन ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे माढा, सोलापूर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर या सभेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज राहुल गांधी यांच्या सभास्थळाची पाहणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top