रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहणाऱ्या माजी विमान वाहतूक मंत्र्यांचा फोटो व्हायरल

हैदराबाद

माजी नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते आपल्या कुटुंबासोबत हैदराबाद रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहत आहे. या व्हायरल फोटोतील त्यांचा साधेपणा लोकांना खूपच आवडला. नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया देत त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले.

या व्हायरल फोटो ‘तेलुगु देसम पार्टी’ने आपल्या एक्स खात्यावरून शेअर केला आहे. अशोक गजपती राजू, स्वतःचा राजा, हैदराबाद रेल्वे स्थानकावर सामान्य माणसाप्रमाणे घरी जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत आहे. हे प्रामाणिकपणा आणि सत्याचे प्रतीक आहे. ते नेहमी लोकांच्या हिताचे करतात. सत्ता त्यांना कधीही भ्रष्ट करू शकत नाही. तुमच्यासाठी हे तेलुगु देसम आहे!, असे फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top