लेह – लडाखमध्ये भूकंपाचे धक्के

लेह

लडाखच्या कारगिलमध्ये काल रात्री १०.५५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. लडाख आणि अंदमानमध्येदेखील मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिस्टल स्केल इतकी होती. कारगिल आणि लडाखसोबतच मध्यरात्री २.२६ वाजण्याच्या सुमारास अफगानिस्तानमध्येदेखील भूकंप झाला. ४.३ रिश्तर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप होता. या भूकंपामध्ये कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झाली नाही. परंतु नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top