लेह – लेह- लडाख परिसरात आज पहाटे ५ वाजून ३९ मिनिटांनी लेह-लद्दाख परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर घाबरलेल्या लेकांनी घराबाहेर धाव घेतली. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू लेह आणि लडाखमध्ये जमिनीत ५ किलोमीटर खोल होता