वारांगनेकडे गेलेल्या ग्राहकाला अटक करणे बेकायदेशीर ठरते!

*मुंबई हायकोर्टाचा
महत्वपूर्ण निर्वाळा

मुंबई- वारांगनेकडे जावून शरीरसुखासाठी पैसे देणे हा गुन्हा नाही.तसेच अशा वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी गेलेल्या ग्राहकाला आरोपी म्हणून अटक करणे बेकायदेशीर आहे,असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिला. तसेच यावेळी न्यायमूर्ती डांगरे यांनी नेहरूनगर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत अटक केलेल्या आरोपीची जामिनावर मुक्तताही केली.

नेहरूनगर पोलिसानी २०२१ मध्ये एका वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकून एका ग्राहकाला अटक केली होती.त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. गेली तीन वर्षे हा आरोपी तुरुंगात होता.त्याने अ‍ॅड.प्रभंजन दवे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी झाली.यावेळी वकील दवे यांनी वेश्यागृहातील ग्राहक भादंवि कलम ३७० च्या कक्षेत मोडत नसल्याचा दावा केला.तसेच त्यांनी यावेळी कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या निर्वाळ्याचा दाखला सादर केला.याची न्यायमूर्ती डांगरे यांनी गंभीर दखल घेत निकाल देताना म्हटले की, वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी आढळलेल्या ग्राहकाला आरोपी म्हणून अटक करणे बेकायदेशीर आहे.तसेच पैसे देऊन लैंगिक सुख उपभोगणे हा गुन्हा नसून तो ग्राहकही आरोपी नाही.दरम्यान,
न्यायालयाने आरोपीला २५ हजाराच्या वैयक्तिक जातमूचलक्यावर आणि दोन हमीदारासह सशर्त जामीन मंजूर केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top