शहापूरच्या आदिवासी पाड्यांत भीषण पाणीटंचाईच्या झळा

शहापूर- धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर सध्या भीषण पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईमुळे तालुक्यातील १४८ गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच आणखी तीन टँकरचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

या तालुक्यात तानसा, वैतरणा आणि भातसा ही मोठी धरणे आहे. या धरणातून मुंबई शहराला पाणीपुरवठा केला जातो. याच तालुक्यातील आदिवासी पाडे मात्र दरवर्षी पाण्यासाठी वणवण करताना दिसतात. तालुक्यातील २६ गावे आणि सुमारे १२ वाड्या, वस्त्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत.या भागात ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अशा टंचाईच्या परिस्थितीत नांदवल, कळगाव ठिले, शेंदून या गावांसाठी असलेली नळपाणी योजनाही कोरडी पडली आहे. या योजनांचे जलस्रोत आटले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top