शिक्षकेतर कर्मचार्यांचे आंदोलन तूर्त स्थगित

मुंबई – शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाने येत्या २० फेब्रुवारीपासून जाहीर केलेले दुसर्या टप्प्यातील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या पदाधिकार्यांच्या सोमवारी बैठकीत केसरकर यांनी मागण्यांबाबत चांगला प्रतिसाद दिला, मागण्या मान्य करण्यासंदर्भात संबंधीतांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे तूर्त २० फेब्रुवारीचे आंदोलन स्थगित आले आहे,असे महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या बैठकीत न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार लवकरच शिक्षकेतर पदांची भरती सुरू करण्यासाठी त्वरित संच मान्यता देण्याबाबतचे निर्देश केसरकर यांनी शिक्षण संचालक यांना दिले. तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी २४ वर्षांची दुसरी कालबध्द पदोन्नती लागू करणेसाठीचा प्रस्ताव तात्काळ कॅबिनेटमध्ये ठेवण्याबाबतचे निर्देश प्रधान सचिवांना देण्यात आले, ग्रंथपालांसाठी कालबध्द पदोन्नती देण्याबाबतचा विषय वित्त विभागाकडे पाठविण्याचे आदेश शिक्षण सचिव यांना दिले. शिक्षकेतर कर्मचारी यांनी शैक्षणिक पात्रता वाढवल्यास त्यांना शिक्षकपदी पदोन्नतीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाल्याने २० फेब्रुवारीचा आंदोलनचा दुसरा टप्पा स्थगित करण्यात येत असून दिलेल्या अश्वासनानुसार निर्णय न झाल्यास महामंडळाचे पदाधिकारी उपोषणास बसणार असा इशाराही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी प्रसृत केलेल्या या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top