शीतल महाजन माऊंट एव्हरेस्टवर उडी मारणारी जगातील पहिली महिला

नवी दिल्ली- स्कायडायव्हिंग क्षेत्रात वेगवेगळे विक्रम करणाऱ्या पुण्यातील पद्मश्री शीतल महाजन-राणे यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने जगातील सर्वाेच्च शिखर असलेल्या नेपाळमधील माऊंट एव्हरेस्टसमोर २१,५०० फुट उंचीवरुन हेलिकाॅप्टरमधून स्कायडायव्हिंग उडी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.त्यामुळे जगातील तीन ध्रुवांवर स्कायडायव्ह करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

पद्मश्री शीतल महाजन यांनी यापूर्वीही विश्वविक्रम केले आहेत. आपल्या नव्या विक्रमाबाबत त्या म्हणाल्या की,माऊंट एव्हरेस्टसमाेर पॅराशूट उडी मारण्याचे स्वप्न मी २००७ मध्ये प्रथम पाहिले.ते प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद आहे.मी माऊंट एव्हरेस्टसमोर २१,५०० फुटांवरून माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम उडी मारली आणि १७,४४४ फुट उंचीवरील काला पत्थरवर उत्तरले.अशा प्रकारे मी सर्वोच्च उंचीचे स्कायडायव्हिंग पूर्ण केले. सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा विक्रम त्यांनी केला.

शीतल महाजन यांनी असेही म्हटले की,बर्फाच्छादित हिमालयातील हवामानाचे स्वरुप गतिमान व सतत बदलणारे असते. आतापर्यंतच्या प्रत्येक एव्हरेस्ट माेहिमेची याेजना अत्यंत अनुकूल हवामानाच्या अनुषंगाने आखण्यात आली.तरी ऐनवेळी हवामानात बदलत हाेतात ते मला अनुभवयास आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top