श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अमेरिकेत हिंदू समुदायाची रॅली

ऑस्टिन :

हिंदू अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात जय श्रीरामच्या जयघोषात वाहनफेरी काढली. या रॅली मार्गात सदस्यांनी एकूण ११ मंदिरांना भेट दिली.

श्रीराममंदिराच्या छायाचित्रासह भारतीय ध्वज आणि अमेरिकन ध्वज घेऊन ५०० हून अधिक लोक या वाहनफेरीत सहभागी झाले होते. या वाहनफेरीत २१६ चारचाकी वाहने होती. ह्युस्टनचे समाजसेवक जुगल मलानी यांनी झेंडा दाखवल्यानंतर श्री मीनाक्षी मंदिरातून वाहनफेरीला प्रारंभ झाला, तर रिचमंड येथील श्री शरद अंबा मंदिरात तिचा समारोप झाला. भारतीय नागरिकांनी विविध मंदिरात भजनाच्या गजरात वाहनफेरीचे स्वागत केले. जय श्रीरामचा जयघोष आणि शंखनाद यामुळे सर्वत्र वातावरण भक्तिमय झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top