श्रीलंकेत कार रेसिंगमध्ये दुर्घटना लहान मुलासह ७ जणांचा मृत्यू

उवा :

श्रीलंका येथील उवा प्रांतात एका कार रेसिंग स्पर्धेत अपघात होऊन ७ व्यक्तींचा मृत्यू झाला. या अघापतात २३ व्यक्ती गंभीर जखमी झाले. या घटनेत कारखाली एक लहान मुलगादेखील चिरडला गेला.

काल उवा प्रांत येथे एक कार रेसिंग स्पर्धा सुरू होती. यामध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा सुरू झाल्यानंतर एका कारने अचानक आपला ट्रॅक बदलला. त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार अनियंत्रीत झाली. ट्रॅक बदलून कार थेट प्रेक्षकांना धडकली.

कार आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून मोठी पळापळ सुरू झाली. या दुर्घटनेत ७ व्यक्तींचा मृत्यू आणि २० जण जखमी आहेत. यात एका ८ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह वैद्यकीय सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. २०१९ पूर्वी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जात होती. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top