सियाचीनमध्ये राजनाथ सिंह यांचा सशस्त्र दलांच्या जवानांशी संवाद

सियाचीन :

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज सियाचीन दौऱ्यावर होते. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर तैनात असलेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतील. गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवल्याची ४० वर्षे पूर्ण केली होती.

काराकोरम पर्वतरांगेत सुमारे २० हजार फूट उंचीवर वसलेला सियाचीन हिमनदी हा जगातील सर्वात उंच लष्करी क्षेत्र म्हणून ओळखला जातो, जिथे सैनिकांना जोरदार बर्फवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांचा सामना करावा लागतो. ‘ऑपरेशन मेघदूत’ अंतर्गत भारतीय लष्कराने एप्रिल १९८४ मध्ये सियाचीन हिमनदीवर आपले संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले होते. सियाचीन हिमनदीवर भारतीय लष्कराने आपल्या अस्तित्वाची ४० वर्षे पूर्ण केली. यानिमित्त राजनाथ सिंह सियाचीनमध्ये दाखल झाले. यावेळी राजनाथ सिंह यांनी सियाचीनमध्ये तैनात असलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांशी त्यांनी संवाद साधला. भारतीय लष्कराने गेल्या काही वर्षांत सियाचीनमध्ये आपल्या अस्तित्वाची छाप उमटवली आहे.राजनाथ सिंह यांनी २४ मार्च रोजी लेह मिलिटरी स्टेशनवर सशस्त्र दलांसोबत होळी साजरी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top