सुलतान इब्राहिम इस्कंदर यांनी मलेशियाच्या राजेपदाची शपथ घेतली

क्वालालुम्पूर –

मलेशियाच्या दक्षिणेकडील जोहोर राज्यातील सुलतान इब्राहिम इस्कंदर यांनी आज देशाचे नवीन राजे म्हणून शपथ घेतली. देशाचे श्रीमंत आणि स्पष्टवक्ते शासक अशी सुलतान इब्राहिम यांची ओळख आहे. त्यांचा शपथविधी सोहळा क्वालालुम्पूर येथील राजवाड्यात पार पडला.

मलेशियामध्ये राजे हे देशाचे औपचारिक प्रमुख असतात. राजेशाहीच्या अनोख्या व्यवस्थेच्या अंतर्गत, मलेशियाच्या नऊ राजघराण्यांचे प्रमुख दर पाच वर्षांनी राजा बनतात. त्यानुसार इब्राहिम हे पुढील पाच वर्षांसाठी मलेशियाचे राजे असतील. त्यांनी आज क्वालालुम्पूर येथील राजवाड्यात इतर राजघराण्यांचे प्रमुख , पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि कॅबिनेट सदस्यांच्या साक्षीने आपल्या पदाची शपथ घेतली. ६५ वर्षीय सुलतान इब्राहिम हे जोहोर राज्याचे रहिवासी आहेत. त्यांच्या राजघराण्याला १६ व्या शतकापासूनचा वारसा आहे. सुलतान इब्राहिम यांचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत अतिशय चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. इब्राहिम यांच्याकडे गाड्या आणि मोटारसायकलींचा मोठा संग्रह आहे. त्यांनी जोहोर आणि शेजारील सिंगापूर यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी मलेशिया आणि शहर-राज्य यांच्यातील रखडलेल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली आहे. बांधकाम व्यवसायापासून खाणकामापर्यंत त्यांचे व्यापक व्यावसायिक हितसंबंध आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top