सैन्याच्या हालचाली टिपण्यासाठी भारत ५० हेरगिरी उपग्रह सोडणार

मुंबई- भारताने आपली भू गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यासाठी पुढील पाच वर्षांत ५० उपग्रह अवकाशात सोडण्याची योजना आखली आहे.हे उपग्रह देशाच्या सीमेवर आणि शेजारच्या भागांवर असलेल्या सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवतील आणि हजारो किलोमीटर क्षेत्राची छायाचित्रे पाठवतील,अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ चे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी मुंबई येथे दिली.

आयआयटी मुंबईने आयोजित केलेल्या वार्षिक विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम ‘टेकफेस्ट’मध्ये ते बोलत होते.सोमनाथ पुढे म्हणाले की,एक मजबूत राष्ट्र बनण्याची भारताची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, त्याच्या उपग्रह ताफ्याचा सध्याचा आकार पुरेसा नाही आणि तो “आजच्या तुलनेत दहापट”असणे आवश्यक आहे.त्याचाच एक भाग म्हणून हे ५० उपग्रह पुढील पाच वर्षांत सोडले जातील.हे उपग्रह देशाच्या सीमा आणि शेजारील भागांवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहेत. हे सर्व उपग्रहावरून पाहता येते.हे हाताळण्यासाठी आम्ही उपग्रह प्रक्षेपित करत आहोत,परंतु आता विचार करण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि आपण त्याकडे अधिक गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे कारण कोणत्याही राष्ट्राची ताकद ही त्याच्या आजूबाजूला काय घडते हे समजून घेण्याच्या क्षमतेत असते. आम्ही ५० उपग्रह एकत्र केले असून त्यांना अंतिम रूप देऊन पुढील पाच वर्षांमध्ये ते अवकाशात सोडले जातील असे सोमनाथ म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top