सोमालियाच्या किनाऱ्याजवळ भारतीय नौदलाचे ऑपरेशन

१९ पाकिस्तानी नागरिकांची सुटका

नवी दिल्ली :

सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या अल नईम आणि एफव्ही इमाम या २ इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाने सुटका केली. दोन दिवसांत दोन इराणी मच्छिमार नौकांचे अपहरण झाले होते. नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेने या दोन्ही नौकांची यशस्वीरित्या सुटका केली. अल नईमवर १९ पाकिस्तानी खलाशी होते. तर इमामवर १७ इराणी खलाशी होते.

२८ जानेवारीला इमाम या नौकेने अपहरण झाल्याचा एसओएस कॉल नौदलाला आला. आयएनएस सुमित्रा तातडीने मदतीला धावून गेली. इमामची सुटका झाल्यावर काही वेळातच अल नईम या नौकेचे अपहरण झाल्याचा दुसरा कॉल आला. आयएनएस सुमित्रावरच्या नौसैनिकांनी आणि कमांडोंनी साहसी कारवाई करत अवघ्या ३६ तासांत अपहरणाचे २ कट उधळले. एकूण ३६ खलाशांची सुटका केली. सोमालियाच्या समुद्री चाचांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top