हमासचा १३५ दिवस युद्धबंदी प्रस्ताव! सर्व ओलिसांना सोडण्यास तयार !

जेरूसलेम – हमासने गाझामध्ये १३५ दिवसांसाठी युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला आहे.सर्व ओलिसांची सुटका करण्यात येईल,असेही त्यात म्हटले आहे. तसेच इस्रायलने गाझा पट्टीतून आपले सैन्य मागे घ्यावे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, युद्धाच्या शेवटी करार केला जाईल, असाही या प्रस्तावात समावेश आहे.मात्र यावर इस्रायल आणि अमेरिकेने थंड प्रतिसाद दिल्याचे वृत्त आहे.
गेल्या आठवड्यात कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांनी पाठवलेल्या प्रस्तावानंतर दहशतवादी गटाचा हा प्रस्ताव आला आहे.हे युद्ध थांबवण्यासाठी कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांनी पाठवलेला प्रस्ताव हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजन्यायिक प्रयत्न मानला जात आहे.
मात्र,हमासचा खात्मा होईपर्यंत गाझामधून आपले सैन्य मागे घेणार नसल्याचे इस्रायलने यापूर्वीच सांगितले आहे.इस्रायलने गाझामधील हमासच्या ताब्यात असलेल्या १३६ ओलिसांपैकी ३१ जणांच्या मृत्यूची पुष्टी करणारे निवेदन जारी केले. हमासच्या प्रस्तावात प्रत्येकी ४५ दिवसांच्या तीन टप्प्यांत ही युद्धविरामाची कल्पना करण्यात आली आहे. हमास हा दहशतवादी गट ७ ऑक्टोबर रोजी पकडलेल्या उर्वरित इस्रायली ओलीसांची पॅलेस्टिनी कैद्यांशी देवाणघेवाण करणार आहे. त्याचवेळी गाझाच्या पुनर्बांधणीला सुरुवात होईल आणि इस्रायली सैन्य पूर्णपणे माघार घेईल. मृतदेहांची देवाणघेवाणही होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हमासच्या राजकीय ब्युरोचे सदस्य एज्जत अल-रेशिक यांनी दुजोरा दिला की हा प्रस्ताव कतार आणि इजिप्तच्या माध्यमातून इस्रायल आणि अमेरिकेला पाठवण्यात आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top