हिंगोलीत २० गावांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के

हिंगोली :

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. काल मध्यरात्री जिल्ह्यातील तब्बल २० गावांमध्ये जमीन हादरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. भूकंपामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, येडुत, धामणी, वसई तर वसमत तालुक्यातील, वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, कुरुंदासह जवळपास २० गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूगर्भातून गुढ आवाज येऊन अचानक जमीन हादरली. भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने नागरिकांची पळापळ झाली. काही घरांमधील भाड्यांची पडझड झाली.यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top