१२ दिवसांनी लासलगावात कांदा लिलाव सुरू

नाशिक

नाशिकच्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दीपावलीच्या तब्बल १२ दिवसांच्या सुट्टीनंतर कांदा लिलाव कालपासून पुन्हा सुरू झाला. लाल कांद्याच्या भावात सरासरी सोळाशे रुपयांची वाढ झाली. मात्र त्याचवेळी उन्हाळ कांद्याच्या भावात सरासरी दोनशे रुपयांची घसरण झाली. बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमाल ४५४५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर लाल कांद्याला ४१०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. १२ दिवसांपूर्वी नाशिकच्या विंचूर उपबाजार वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद होता. सणासुदीच्या काळात कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, तब्बल १२ दिवसांनी कांदा लिलाव पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top