४ सामन्यांत पाच शतके ‘अग्नी ‘चा ऐतिहासिक विक्रम

नवी दिल्ली – ‘१२ वी फेल’ या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा अग्नी चोप्रा सध्या क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे.अग्नीने नुकतेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि लगेच विक्रमांची मालिका रचली. मिझोरामकडून खेळताना त्याने पहिल्या ४ सामन्यात ५ शतके झळकावली आहेत. अशाप्रकारे अग्नीने रणजी ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक विक्रम केला आहे.

२५ वर्षीय खेळाडूने कारकीर्दीतील पहिल्या चार प्रथम श्रेणी सामन्यांपैकी प्रत्येकी शतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू बनण्याचा विक्रम अग्नी चोप्राने केला आहे.हा विक्रम सोशल मीडियावर व्हायरल होताच अग्नीची आई आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रानेही एक पोस्ट टाकून अभिमान व्यक्त केला.अग्नी चोप्राने रणजी ट्रॉफी २०२४ हंगामात आतापर्यंत ४ सामने खेळले असून ९५.८७ च्या उत्कृष्ट सरासरीने ७६७ धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेटही १११.८० राहिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top