उन्हाळ कांद्याच्या दरात ४१० रुपयांची घसरण

नाशिक –
मार्च आणि एप्रिल महिन्यात साठवलेल्या उन्हाळ कांद्याची गुणवता घसरल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील काद्यांच्या दरात कालच्या तुलनेत प्रतिक्विटल ४१० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. काल कमाल ३८४७ रुपये प्रतिक्विटलने विक्री झालेल्या उन्हाळी कांद्याला आज कमाल ३४३७ रुपयांचा भाव मिळाला, तर लाल कांदा प्रतिक्विटल ३४७ रुपयांनी घसरला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून नवीन कांद्याची आवक वाढल्याने उन्हाळ कांद्याच्या मागणीत घट झाली. गेल्या महिन्यात कांद्याचे किमान निर्यातमुल्य दरात ८०० डॉलर प्रतिटन वाढ केल्याने निर्यात जवळपास ठप्प झाली होती. नाफेडने साठवणूक केलेल्या दोन लाख टन कांद्याची किरकोळ बाजारात २५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू केल्यानेही भाव घसरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top