अजित पवार आणि अडसूळ भेटीत २० मिनिटे चर्चा

अमरावती- अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारावरुन माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.त्यात आज अमरावतीत एका लग्न सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली विद्यमान खासदार नवनीत राणा 2019मध्ये राष्ट्रवादीने समर्थन दिलेल्या उमेदवार होत्या. मात्र त्यांनी नंतर भाजपाशी जवळीक साधली. नवनीत राणा यांनी तत्कालीन शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अडसूळ पराभूत केले होते. आता अडसूळ शिंदे गटासोबत आहेत आणि त्यांनी अमरावती मतदारसंघावर दावा केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top