अभिनेता विनोद थॉमस यांचा मृतदेह कारमध्ये सापडला

तिरुअंनतपुरम
प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते विनोद थॉमस पंपाडीजवळील एका हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
पोलिसांनी याप्रकरणी सांगितले की, एक व्यक्ती त्यांच्या हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये आहे. तो कोणत्याही हालचाल करत नाही, पंपाडीजवळील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.ही व्यक्ती अभिनेते विनोद थॉमस असल्याचे पोलिसांना समजले. त्यांना साद घालूनही त्यांनी कारचा दरवाजा न उघडल्याने गाडीच्या बाजूची काच फोडून विनोद यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
त्यांच्या मृत्यूची वृत ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. विनोद थॉमस यांचा मृत्यू का झाले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र कारमधील एसीमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विनोद थॉमस यांनी बिजू मेनन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अयप्पनम कोशियुम या हिट चित्रपटात काम केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top