सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

मुंबई – शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स ४५७ अंकांनी घसरून ७२,९४२ वर बंद झाला. निफ्टीही १२४ अंकांनी घसरून २२,१४७ वर स्थिरावला. बाजारात सर्वाधिक विक्री आयटी क्षेत्रात झाली. इस्रायल आणि हमास युद्धानंतर इराण आणि इस्रालमधील तणाव वाढत आहे. या दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे.

सेन्सेक्सवर इन्फोसिस, इंडसइंड बँक विप्रो हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी घसरले. त्यासोबतच बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, एलटी, बजाज फायनान्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत राहिले. निफ्टीवर इन्फोसिस इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, विप्रो हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. आयशर मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, ओएनजीसी, टायटन, डिव्हिज लॅब हे शेअर्स तेजीत राहिले. निफ्टी मिडकॅप १०० , निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये आज घसरण झाली. निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फार्मा आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात वाढ झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top