जगातील सर्वात घातक F-35 फायटर जेटची वैशिष्ट्ये काय आहेत? ट्रम्प यांनी भारताला देण्याची दर्शवली होती तयार

F-35 Fighter Jet

F-35 Fighter Jet | जगातील सर्वात घाटक F-35 फायटर जेटला केरळमध्ये अचानक लँडिंग करावे लागले होते. तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्रिटनचं एफ-35बी लाईटनिंग II फायटर जेट (F-35B Lightning II) आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावं लागले होते.

हे जेट एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स कॅरियर स्ट्राईक ग्रुपचाभाग आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालं नाही, पण यामुळे लॉकहीड मार्टिनने (Lockheed Martin) विकसित केलेल्या एफ-35 प्रोग्रामवर पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटीत एफ-35 फायटर जेट विकण्याची ऐतिहासिक ऑफर दिली. होते. हे फायटर जेट एवढे घातक असण्याचे कारण काय आहे, जाणून घेऊया.

एफ-35 जेटची वैशिष्ट्यं:

एफ-35 लाईटनिंग II हे लॉकहीड मार्टिनने विकसित केलेलं पाचव्या पिढीचं फायटर जेट आहे, जे जगातील सर्वात प्रगत फायटर जेट मानलं जातं. याची प्रमुख वैशिष्ट्यं खालीलप्रमाणे आहेत:

स्टेल्थ तंत्रज्ञान (Stealth Technology): रडार टाळण्याची क्षमता यामुळे युद्धात जेट कमी दृश्यमान राहतं.

प्रगत एव्हिऑनिक्स: सेन्सर फ्युजन आणि एआय-आधारित सिस्टिम्सयामुळे युद्धभूमीवर उत्कृष्ट जागरूकता मिळते.

सुपरसॉनिक वेग: स्टेल्थ क्षमता कायम ठेवत ताशी 1,960 किमी वेग गाठतो.

नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर: रिअल-टाइम डेटा शेअरिंगद्वारे हवाई, जमीन आणि नौदलाशी समन्वय साधण्यास मदत होते.

मल्टी-रोल क्षमता: हवाई वर्चस्व, स्ट्राईक मिशन्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि गुप्तचर माहिती गोळा करणं यासाठी डिझाइन केलं आहे.

एफ-35 चे व्हेरिएंट्स:

एफ-35 प्रोग्राममध्ये तीन मुख्य व्हेरिएंट्स (Variants) आहेत:

एफ-35ए (F-35A): पारंपरिक टेकऑफ आणि लँडिंगसाठी प्रामुख्याने यूएस एअर फोर्ससाठी.

एफ-35बी (F-35B): शॉर्ट टेकऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग यूएस मरीन कॉर्प्ससाठी. तिरुअनंतपुरम लँडिंगमधील जेट हेच होतं.

एफ-35सी (F-35C): विमानवाहू नौकांसाठी, यूएस नेव्ही आणि मरीन कॉर्प्ससाठी.


एफ-35 हे नाटो देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. ऑस्ट्रेलिया 72 एफ-35ए जेट्स ऑपरेट करते, तर युनायटेड किंगडम (, इटली आणि नॉर्वे यांच्या ताफ्यात देखील या फायटर जेटचा समाविष्ट आहे. हे जेट 2080 पर्यंत सेवेत राहण्याची शक्यता आहे. मात्र, याची किंमत प्रति युनिट 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि आजीवन ऑपरेशनल खर्च 2 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे आहे.