Home / महाराष्ट्र / पिंपरी चिंचवडमध्ये विहिरीत १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह

पिंपरी चिंचवडमध्ये विहिरीत १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह

पुणे – पिंपरी- चिंचवडमधील चऱ्होली परिसरातील चोविसावाडीत आज सकाळच्या सुमारास एका विहिरीत १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह (body)आढळला. वैष्णवी संतोष इंगवले...

By: Team Navakal
8-year-old girl body was found on the bank of a well
Social + WhatsApp CTA

पुणे – पिंपरी- चिंचवडमधील चऱ्होली परिसरातील चोविसावाडीत आज सकाळच्या सुमारास एका विहिरीत १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह (body)आढळला. वैष्णवी संतोष इंगवले (Vaishnavi Santosh Ingavale)असे मृत तरुणीचे नाव आहे. ती कालपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी दिघी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस तपास सुरू असतानाच तिच्या घराजवळील एका विहिरीच्या काठावर तिची ओढणी आढळली. त्यामुळे पोलीस आणि कुटुंबीयांना तिने विहिरीत उडी मारल्याचा संशय आला.

अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांनी विहिरीत ४५ फूट (45 feet) खोल अंडरवॉटर कॅमेरा टाकून शोध घेतला असता, कॅमेऱ्यात वैष्णवीचा मृतदेह दिसला. हा मृतदेह अग्निशमन कर्मचाऱ्यांनी विहिरीतून बाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात (hospital)पाठवण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या