Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : अपघातात 6 मृत्यू ! मग मृतदेह पाचच कसे? दोन्ही पायलट ट्रॅफिक जॅममध्ये कसे अडकले ! अजित पवारांच्या अपघाताबद्दल संशय

Ajit Pawar : अपघातात 6 मृत्यू ! मग मृतदेह पाचच कसे? दोन्ही पायलट ट्रॅफिक जॅममध्ये कसे अडकले ! अजित पवारांच्या अपघाताबद्दल संशय

Ajit Pawar ; उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताबाबत गंभीर संशय सातत्याने...

By: Team Navakal
ajit pawar
Social + WhatsApp CTA
Ajit Pawar ; उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताबाबत गंभीर संशय सातत्याने व्यक्त होत असून, विमानाच्या ब्लॅकबॉक्समध्ये कोणती माहिती आढळली ती लवकरात लवकर उघड करावी, अशी मागणी अजित पवार गटासह सर्वांकडूनच होत आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्‍न विचारले आहेत. या प्रश्‍नांमुळे या अपघाताबद्दल गूढ अधिकच वाढले आहे.


अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आज सकाळीच याबाबत पोस्ट करून खळबळ उडवून दिली. त्यांनी विचारले की, या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले होते. मग पाचच मृतदेह कसे सापडले. मयत झालेली सहावी व्यक्ती कोण आहे? या अपघातात सर्वांचा होरपळून मृत्यू झालेला असताना विमानातील एकही कागद जळालेला कसा नाही? उड्डाणाआधी नियोजित पायलट बदलून ऐनवेळी कपूर यांना का आणले गेले? उपमुख्यमंत्र्यांसारख्या अति महत्त्वाच्या व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी सदोष ठरलेले लिअरजेट विमान का निवडण्यात आले? ज्या पायलटवर याआधी मद्यपान केल्याबाबत कारवाई करण्यात आली होती त्याला ऐनवेळेस का नियुक्त करण्यात आले? त्याचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कोठे आहे? विमानाला दिलेले सेफ्टी क्‍लिअरन्स सर्टिफिकेट कुठे आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली गेली पाहिजे.


अजित पवार गटाच्याच दुसर्‍या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनीही अपघाताबाबत संशय व्यक्त करत म्हटले की, या अपघाताची पारदर्शक चौकशी जगासमोर आणली पाहिजे. सकाळी 8 वाजता विमान उडणार होते. असे असताना या विमानाचे नियोजित दोन पायलट कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश हे ट्रॅफिकमध्ये अडकले असे सांगितले गेले. हे ट्रॅफिकमध्ये अडकल्याने ऐनवेळी तिसरा पायलट नियुक्त करण्यात आला. मात्र दोन पायलट एकाचवेळेस ट्रॅफिकमध्ये कसे अडकतात? सकाळी 8 वाजताचे विमान होते तर इतक्या सकाळी कोणत्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होण्याइतकी वाहतूक होती? अचानक पायलट बदलल्यावर त्याची मेडिकल केली होती का? विमानाची सुरक्षा प्रक्रिया केली होती का? हे सर्व जाणणे गरजेचे आहे.


शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, प्रत्येक जण आपापल्या दृष्टीकोनातून या अपघाताकडे पाहत आहे. विमान तिरपे होऊन कसे कोसळले, हा प्रश्न सर्वांनाच पडतोय. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या समोर असलेल्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमधील व्हिडिओ समोर आला असून, तो वेगळे चित्र दाखवतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सरकारनेही ही मागणी मान्य केली असून, या अपघाताबाबतचौकशी सुरू आहे.


अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीचे निष्कर्ष महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेच पाहिजेत. ब्लॅक बॉक्समध्ये नोंदवलेली सर्व माहिती तपास पथकाकडून सखोलपणे तपासली जाईल.


यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) यांच्या तपास यंत्रणा सध्या कार्यरत आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यामध्ये संपूर्ण उड्डाणाचा तपशील नोंदवलेला असतो. या माहितीच्या आधारे तपास करण्यात येणार असून, सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर सत्य समोर येईल.

—————————————————————————————————————————-

हे देखील वाचा –

वरुण धवनला मुंबई मेट्रोने फटकारले! धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणे पडले महागात; सुरक्षेवरून दिले कडक संकेत

नात्याच्या अफवांना पूर्णविराम की भांडण? चहल आणि आरजे महवशची सोशल मीडियावरील ‘ती’ कृती ठरतेय चर्चेचा विषय

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या