Home / क्रीडा / T20 World Cup : नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इशान किशनला सरावादरम्यान दुखापत

T20 World Cup : नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इशान किशनला सरावादरम्यान दुखापत

T20 World Cup : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे....

By: Team Navakal
T20 World Cup
Social + WhatsApp CTA

T20 World Cup : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टार सलामीवीर इशान किशन सरावादरम्यान जखमी झाला असून दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्माच्या खेळण्यावरही अद्याप टांगती तलवार आहे.

इशान किशनला बुमराहचा ‘यॉर्कर’ नडला

अरुण जेटली स्टेडियमवर सराव सुरू असताना इशान किशनला दुखापत झाली. जसप्रीत बुमराहने टाकलेला एक वेगवान यॉर्कर थेट इशानच्या पायाच्या अंगठ्यावर जाऊन लागला. चेंडू लागताच इशान वेदनेने विव्हळताना दिसला आणि तातडीने फिजियोला मैदानात बोलावण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर इशानने पुन्हा 5 मिनिटे फलंदाजी केली, ही व्यवस्थापनासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. मात्र, उद्याच्या सामन्यात तो पूर्णपणे फिट असेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अभिषेक शर्मा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

दुसरीकडे, युवा फलंदाज अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गामुळे दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल होता. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, संघाचा सहकारी टिळक वर्मा याने पत्रकार परिषदेत माहिती दिली की, अभिषेकला 11 फेब्रुवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तो आज खेळणार की नाही, याचा निर्णय सामन्याच्या दिवशी सकाळी घेतला जाईल.

भारताची आतापर्यंतची कामगिरी

भारतीय संघ अ गटात असून यामध्ये पाकिस्तान, नेदरलँड्स, नामिबिया आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेचा 29 धावांनी पराभव करून स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. आता नामिबियाविरुद्ध विजय मिळवून आपला दावा अधिक भक्कम करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या