Home / महाराष्ट्र / Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनाबाबत घातपाताची शंका? “ब्लॅक बॉक्स नष्ट होऊच शकत नाही”; जय पवारांच्या पोस्टने खळबळ

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनाबाबत घातपाताची शंका? “ब्लॅक बॉक्स नष्ट होऊच शकत नाही”; जय पवारांच्या पोस्टने खळबळ

Ajit Pawar plane crash investigation: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले....

By: Team Navakal
Ajit Pawar plane crash investigation
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar plane crash investigation: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असतानाच, आता या अपघाताच्या कारणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा केवळ एक अपघात होता की घातपात, या चर्चेने आता जोर धरला आहे.

जय पवार यांचे भावनिक आणि तांत्रिक प्रश्न

अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “विमान अपघातात ब्लॅक बॉक्स इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला या भीषण दुर्घटनेचे सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

जय पवार यांनी संबंधित विमान कंपनीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली असून, विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य त्रुटींची निष्पक्ष चौकशी व्हावी, असेही नमूद केले आहे. “Miss You Dad” म्हणत त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर काही तांत्रिक मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या मते, ब्लॅक बॉक्स हा साधारण ११०० अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित राहतो. विमानाची बॉडी ६३५ अंशावर वितळू शकते, परंतु ब्लॅक बॉक्स अत्यंत कठीण धातूचा बनलेला असतो.

नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सबाबत दिलेली माहिती घाईत दिलेली वाटते, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. अपघाताच्या ठिकाणी अनेक कागदपत्रे जळाली नव्हती, मग ब्लॅक बॉक्सबाबत साशंकता का निर्माण केली जात आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

    काय घडले होते २८ जानेवारीला?

    अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला निघाले होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करताना विमानाचा अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्व ५ जणांचा मृत्यू झाला. २९ जानेवारी रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    आता कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, सत्य समोर आणण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

    Web Title:
    For more updates: , , stay tuned with Navakal
    संबंधित बातम्या