Navakal Special Interview : वैद्यकीय क्षेत्रात काळानुरूप नवनवीन आरोग्यविषयक प्रवाह येत असतात. काही वर्षांपूर्वी ड जीवनसत्व (Vitamin D3) आणि ब-१२ (Vitamin B12) च्या कमतरतेची चर्चा सर्वत्र ऐकू येत होती. त्यानंतर थायरॉईड, रक्तातील प्रथिनांचे प्रमाण आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब ठरली. सद्यस्थितीत ही लाट ‘मॅग्नेशियम’कडे वळल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियापासून ते औषधांच्या दुकानांपर्यंत सर्वत्र मॅग्नेशियम सप्लिमेंट्स, स्प्रे, गोळ्या आणि गमीजचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे की, हे खनिज खरोखरच आरोग्यासाठी इतके अनिवार्य आहे की हा केवळ औषध कंपन्यांनी आपला व्यापार वाढवण्यासाठी पसरवलेला एक बागुलबुवा आहे?
याच पार्श्वभूमीवर, मॅग्नेशियमच्या या कथित ‘लाटे’मागील नेमके सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘नवाकाळ’ घेऊन येत आहे एका तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष मुलाखत. मॅग्नेशियमचे महत्त्व आणि त्याभोवती गुंफलेले व्यावसायिक गणित यांचा उलगडा या मुलाखतीतून होणार आहे. आरोग्याशी निगडित हा अत्यंत कळीचा मुद्दा सविस्तरपणे समजून घेण्यासाठी मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजीचा ‘नवाकाळ’चा अंक नक्की वाचा.
हे देखील वाचा – MLA Ramdas Masram Case: मुरुम उत्खननावरून राडा! काँग्रेस आमदारासह 6 जणांवर गुन्हा; मजुराला मारहाण केल्याचा आरोप















