Kodak 65 Inch Mini LED TV: दिग्गज टेक कंपनी कोडाकने भारतात आपल्या प्रीमियम टीव्ही सेगमेंटचा विस्तार करत नवीन IconiK सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये ६५ इंचाचा 4K मिनी क्यूडी गुगल टीव्ही सादर करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जबरदस्त साऊंड क्वालिटीमुळे हा टीव्ही ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
डिस्प्ले आणि पिक्चर क्वालिटी
या टीव्हीमध्ये ६५ इंचाचा 4K मिनी एलईडी पॅनेल देण्यात आला आहे. यामध्ये १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळत असल्याने व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अतिशय स्मूथ राहतो.
- ब्राइटनेस: १५०० निट्सपर्यंतची पीक ब्राइटनेस, ज्यामुळे चित्र स्पष्ट आणि उठावदार दिसते.
- तंत्रज्ञान: हा टीव्ही क्वांटम डॉट तंत्रज्ञानावर आधारित असून यामध्ये २८८ लोकल डिमिंग झोन दिले आहेत.
- कलर सपोर्ट: यामध्ये १.१ बिलियन कलर्स आणि अल्ट्रा डब्ल्यूसीजी सपोर्ट मिळतो. तसेच डॉल्बी व्हिजन, HDR10 आणि HLG मुळे सिनेमाचा अनुभव घरामध्येच घेता येईल.
दमदार साऊंड आणि गेमिंग फीचर्स
मनोरंजनाची मजा द्विगुणित करण्यासाठी कोडाकने यामध्ये ६ स्पीकर्स आणि २ सबवूफर दिले आहेत. यातून १०८ वॉटचा जबरदस्त साऊंड आउटपुट मिळतो. तसेच डॉल्बी ॲटमॉस सपोर्टमुळे आवाजाची स्पष्टता अधिक चांगली जाणवते. गेमिंग प्रेमींसाठी यामध्ये VRR आणि ALLM सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे हाय-स्पीड गेम्स विनाअडथळा खेळता येतील.
किंमत आणि उपलब्धता
कोडाकच्या या ६५ इंचाच्या IconiK सिरीज (K65Mini5020) टीव्हीची किंमत ५७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्ट टीव्ही ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असून कंपनी यावर १ वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.
प्रोसेसर आणि कनेक्टिव्हिटी
टीव्हीच्या कामगिरीसाठी यामध्ये मीडियाटेक प्रोसेसर आणि माली G52 जीपीयूं देण्यात आला आहे. यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी अंतर्गत स्टोरेज मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड वाय-फाय, तीन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट आणि ब्लूटूथ ५.० यांसारखे सर्व आवश्यक पर्याय उपलब्ध आहेत.











