Home / लेख / Samsung Galaxy S26 Ultra: सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लाँच! 200MP कॅमेरा आणि जबरदस्त AI फीचर्स; पाहा किंमत

Samsung Galaxy S26 Ultra: सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लाँच! 200MP कॅमेरा आणि जबरदस्त AI फीचर्स; पाहा किंमत

Samsung Galaxy S26 Ultra: स्मार्टफोन विश्वातील दिग्गज कंपनी सॅमसंगने आपला सर्वात प्रीमियम आणि शक्तिशाली फ्लॅगशिप फोन ‘Samsung Galaxy S26 Ultra’...

By: Team Navakal
Samsung Galaxy S26 Ultra
Social + WhatsApp CTA

Samsung Galaxy S26 Ultra: स्मार्टफोन विश्वातील दिग्गज कंपनी सॅमसंगने आपला सर्वात प्रीमियम आणि शक्तिशाली फ्लॅगशिप फोन ‘Samsung Galaxy S26 Ultra’ जागतिक बाजारपेठेत सादर केला. अत्यंत वेगवान प्रोसेसर, शानदार कॅमेरा प्रली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित नवीन फीचर्स ही या फोनची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

किंमत आणि उपलब्धता

भारतात सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल:

  • 12GB + 256GB: 1,39,999 रुपये
  • 12GB + 512GB: 1,59,999 रुपये
  • 16GB + 1TB: 1,89,999 रुपये हा फोन ब्लॅक, ब्लू, पर्पल आणि व्हाईट अशा चार आकर्षक रंगांमध्ये सादर करण्यात आला असून, 25 फेब्रुवारीपासून याचे प्री-ऑर्डर सुरू होतील.

डिस्प्ले आणि परफॉर्मन्स

या फोनमध्ये 6.9 इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला आर्मर 2 चा वापर करण्यात आला आहे. यामध्ये खास ‘प्रायव्हसी डिस्प्ले’ फीचर आहे, जे 30 डिग्रीपेक्षा जास्त कोनातून पाहिल्यास स्क्रीनवरील मजकूर इतरांना दिसू देत नाही.

परफॉर्मन्ससाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 हा सर्वात आधुनिक चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित One UI 8.5 वर चालतो.

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये मागील बाजूस चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे:

  1. मुख्य कॅमेरा: 200 मेगापिक्सल (OIS सह)
  2. पेरिस्कोप टेलिफोटो: 50 मेगापिक्सल (5x ऑप्टिकल झूम)
  3. अल्ट्रा वाईड: 50 मेगापिक्सल
  4. टेलिफोटो: 10 मेगापिक्सल (3x ऑप्टिकल झूम) या कॅमेऱ्याद्वारे 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि 360-डिग्री स्टॅबिलायझेशन शक्य आहे. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी असून ती 60W वायर्ड आणि 25W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

स्मार्ट गॅलेक्सी AI फीचर्स

सॅमसंगने यामध्ये अनेक नवीन AI टूल्स दिले आहेत. ‘नाऊ असिस्ट’ तुमच्या स्क्रीनवरील हालचालींनुसार सूचना देते, तर ‘कॉल स्क्रीन’ अनोळखी कॉल्सना आपोआप उत्तर देऊन त्यांचे लिखित मजकूर (Transcript) पुरवते. याशिवाय फोटो एडिटिंग आणि मजकूर लेखनासाठी प्रगत एआय टूल्स यात समाविष्ट आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या