Home / महाराष्ट्र / Buldhana Crime News : शेगावमध्ये तरुणीला ब्लॅकमेलचा धक्कादायक प्रकार; ‘संबंध ठेव नाहीतर…’ युवकाची धमकी

Buldhana Crime News : शेगावमध्ये तरुणीला ब्लॅकमेलचा धक्कादायक प्रकार; ‘संबंध ठेव नाहीतर…’ युवकाची धमकी

Buldhana Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थिनींचा छळ केल्याच्या...

By: Team Navakal
Buldhana Crime News
Social + WhatsApp CTA

Buldhana Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थिनींचा छळ केल्याच्या दोन संतापजनक घटना समोर आल्या आहेत. दोन्ही प्रकरणांत पीडित मुलींनी धैर्याने आवाज उठवल्यानंतर नागरिकांनी आरोपींना चांगलाच धडा शिकवला असून, पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे.

ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पोलीस कोठडी-
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला एका तरुणाने अश्लील फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २७ वर्षीय मोहम्मद शाकीर नामक तरुण पीडित तरुणीला “माझ्याशी संबंध ठेव आणि संभाषण सुरू ठेव, अन्यथा तुझे अश्लील फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करेन,” अशी धमकी देत मानसिक त्रास देत होता. या जाचाला कंटाळून पीडितेने सामाजिक कार्यकर्त्यांकडे धाव घेतली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शेगाव शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेला शहरात ‘लव जिहाद’चे स्वरूप देऊन अफवा पसरवल्या जात असल्याने, नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रावर शिक्षकाचे नीच कृत्य-
दुसरी घटना छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरात घडली आहे. सध्या सुरू असलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान एका परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या शिक्षकाने परीक्षार्थी विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. या शिक्षकाने केवळ विनयभंगच केला नाही, तर विद्यार्थिनीचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून तिला वारंवार फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. पीडित मुलीने हा सर्व प्रकार तत्काळ आपल्या पालकांना सांगितला. संतापलेल्या नातेवाईकांनी शाळा व्यवस्थापनासमोर संबंधित शिक्षकाला जाब विचारला असता, त्याने आपली चूक कबूल केली. यावेळी संतप्त नातेवाईक आणि संस्थाचालकांनी या नराधम शिक्षकाला चोप दिला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण संस्थेने संबंधित शिक्षकाला तातडीने निलंबित केले असून, त्याने इतर विद्यार्थिनींनाही असाच त्रास दिला असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या