Home / लेख / फक्त 13 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला दमदार Lava Bold 2 5G; फीचर्स एकदा बघाच

फक्त 13 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला दमदार Lava Bold 2 5G; फीचर्स एकदा बघाच

Lava Bold 2 5G : भारतीय स्मार्टफोन कंपनी लाव्हाने आपल्या ‘बोल्ड’ सीरिजचा विस्तार करत नवीन ‘Lava Bold 2 5G’ भारतात...

By: Team Navakal
Lava Bold 2 5G
Social + WhatsApp CTA

Lava Bold 2 5G : भारतीय स्मार्टफोन कंपनी लाव्हाने आपल्या ‘बोल्ड’ सीरिजचा विस्तार करत नवीन ‘Lava Bold 2 5G’ भारतात सादर केला आहे. एप्रिल २०२५ मध्ये लाँच झालेल्या मागील मॉडेलची जागा आता हा नवीन फोन घेणार आहे. आकर्षक लूक, शक्तिशाली प्रोसेसर आणि ब्लोटवेअर-मुक्त अनुभवामुळे हा फोन बजेट सेगमेंटमध्ये एक तगडा स्पर्धक ठरणार आहे.

Lava Bold 2 5G : किंमत

या नवीन स्मार्टफोनची किंमत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटसाठी १२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ग्राहकांसाठी २ रंगांत उपलब्ध असेल:

  1. फदर व्हाईट
  2. मिडनाईट ब्लॅक

हा फोन १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता ॲमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीने ग्राहकांसाठी ‘फ्री डोअरस्टेप सर्व्हिस’ देण्याचेही आश्वासन दिले आहे.

Lava Bold 2 5G : प्रमुख वैशिष्ट्ये

  • डिस्प्ले: यात ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला असून १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटमुळे यूजर्स अत्यंत स्मूथ अनुभव मिळेल.
  • प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७०६० चिपसेटवर चालतो. अँटुटू बेंचमार्क टेस्टमध्ये या फोनने ५ लाखांहून अधिक स्कोअर मिळवला आहे. तसेच यात ६ जीबी एलपीडीडीआर५ रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.
  • कॅमेरा सेटअप: मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर असलेला मुख्य कॅमेरा आहे. सेल्फीसाठी समोरच्या बाजूला ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
  • बॅटरी आणि चार्जिंग: ५००० एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.
  • सॉफ्टवेअर आणि सुरक्षा: हा फोन थेट अँड्रॉइड १५ वर आधारित असून, युजर्सना कोणत्याही जाहिरातींशिवाय (ॲड-फ्री) अनुभव मिळेल. सुरक्षिततेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि धूळ-पाण्यापासून बचावासाठी आयपी६४ रेटिंग देण्यात आली आहे.

मिडनाईट ब्लॅक आणि फदर व्हाईट अशा दोन रंगांत सादर झालेला हा स्मार्टफोन त्याच्या ७.५५ मिमीच्या स्लिम डिझाइनमुळे हाताळायला अत्यंत सोयीस्कर आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या