Home / महाराष्ट्र / Ashok Kharat and Rupali Chakankar : नाशिकचे ‘अशोक खरात’ प्रकरण पेटले; राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांवर गंभीर आरोप,थेट केली अटकेची मागणी

Ashok Kharat and Rupali Chakankar : नाशिकचे ‘अशोक खरात’ प्रकरण पेटले; राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांवर गंभीर आरोप,थेट केली अटकेची मागणी

Ashok Kharat and Rupali Chakankar : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा पर्दाफाश झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला...

By: Team Navakal
Ashok Kharat and Rupali Chakankar
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat and Rupali Chakankar : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा पर्दाफाश झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. भविष्य सांगण्याच्या आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या बहाण्याने शेकडो निष्पाप महिलांवर शारीरिक अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर ठपका खरातवर ठेवण्यात आला आहे. मात्र, आता या प्रकरणाला एक धक्कादायक राजकीय वळण मिळाले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव या वादात ओढले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिला आयोगाकडे येणाऱ्या महिलांना खराताकडे पाठवले जायचे, असा गंभीर आरोप केला आहे. महिला आयोगाकडे येणाऱ्या महिलांना खराताकडे पाठवले जायचे, असा गंभीर आरोप केला आहे.

महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा
अशोक खरातने महिलांच्या श्रद्धेचा आणि असहायतेचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यात जर थेट महिला आयोगाशी संबंधित व्यक्तींचा किंवा माजी अध्यक्षांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले, तर ती राज्याच्या इतिहासातील अत्यंत लाजीरवाणी घटना ठरेल. रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेल्या या आरोपांमुळे आता या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, केवळ खरातच नव्हे तर त्याला पाठीशी घालणाऱ्या किंवा त्याला ‘बळी’ पुरवणाऱ्या साखळीचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे.

‘अशोक खरात’ प्रकरणात रुपाली चाकणकरांना अटक करा; सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची नाशिक पोलीस आयुक्तांकडे मागणी-
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अमानवीय कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या गंभीर विषयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी आज नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

“चाकणकरच चालवत होत्या रॅकेट”- रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप-
पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी अत्यंत स्फोटक आरोप केले. त्या म्हणाल्या, “अशोक खरात याच्या माध्यमातून महिलांचे शोषण करणारे हे संपूर्ण रॅकेट स्वतः रुपाली चाकणकर चालवत होत्या, असे प्राथमिक बाबींवरून समोर येत आहे. या प्रकरणात केवळ खरातला अटक करून चालणार नाही, तर या रॅकेटच्या मुख्य सूत्रधार म्हणून चाकणकर यांचीही चौकशी झाली पाहिजे. ‘झाशीची राणी प्रतिष्ठान’च्या वतीने आम्ही त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत पीडित महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही.”

पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये हस्तक्षेपाचा दाव-
रुपाली ठोंबरे पाटील यांनी केवळ नाशिकमधील घटनेवरच नव्हे, तर पूर्वीच्या काही प्रकरणांवरही प्रकाश टाकला. शिर्डी आणि आर्वी येथे दाखल झालेल्या गुन्ह्यांचा संदर्भ देत त्यांनी असा दावा केला की, त्या प्रकरणांमध्ये जे गुन्हे दाखल झाले होते, ते राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या दबावाखालीच करण्यात आले होते. सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून त्यांनी अनेक बाबी दडपल्याचा किंवा वळवल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांचा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांवर खळबळजनक आरोप-
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांच्या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खळबळजनक दावा केला आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटनात्मक संस्थेचा वापर भोंदूगिरीला खतपाणी घालण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

समुपदेशनाच्या नावाखाली दिशाभूल?
पुढे त्या म्हणतात “राज्य महिला आयोगाकडे आलेल्या महिलांचे समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतील ग्रह चेक करुन घ्या, असे बाबा आहेत. असं करुन ते प्रकरण वर्ग केल जात होत, असा दावाही रुपाली ठोंबरें पाटील यानी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण एसआयटीकडे गेले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या