Home / लेख / नवीन कार घेणाऱ्यांना झटका! Hyundai ने ‘या’ गाडीच्या किंमतीत केली मोठी वाढ

नवीन कार घेणाऱ्यांना झटका! Hyundai ने ‘या’ गाडीच्या किंमतीत केली मोठी वाढ

Hyundai Venue price hike 2026 India : भारतीय रस्ते आणि मध्यमवर्गीयांच्या पसंतीला उतरलेली सब-फोर मीटर एसयूव्ही Hyundai Venue आता खरेदी...

By: Team Navakal
Hyundai Venue price hike 2026 India
Social + WhatsApp CTA

Hyundai Venue price hike 2026 India : भारतीय रस्ते आणि मध्यमवर्गीयांच्या पसंतीला उतरलेली सब-फोर मीटर एसयूव्ही Hyundai Venue आता खरेदी करणे थोडे महाग होणार आहे. ह्युंदाई मोटर्सने आपल्या या लोकप्रिय मॉडेलच्या किमतीत सुधारणा केली असून, नवीन दर लागू केले आहेत.

विशेष म्हणजे, कंपनीने कारच्या मूळ किमतीत किंवा सर्वात महागड्या मॉडेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, परंतु मध्यम श्रेणीतील (Mid-variants) सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांचे भाव आता वधारले आहेत.

बदललेले नवीन दरपत्रक खालीलप्रमाणे:

१. पेट्रोल इंजिन मॉडेल्स: पेट्रोल व्हेरिएंटमध्ये कंपनीने सर्वात मोठा झटका HX 5 मॅन्युअल ट्रिम घेणाऱ्यांना दिला आहे. या गाडीची किंमत थेट २०,००० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. इतर पेट्रोल मॉडेल्सच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.

२. टर्बो पेट्रोलची पॉवर आता महागली: जर तुम्हाला वेगाने धावणारी टर्बो इंजिनची Hyundai Venue हवी असेल, तर त्यासाठी आता थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. HX 5 DCT आणि HX 6 DCT च्या किमतीत प्रत्येकी ९,००० रुपयांची वाढ झाली आहे, तर HX 8 DCT साठी ५,००० रुपये अधिक मोजावे लागतील.

३. डिझेल व्हेरिएंट्समध्येही दरवाढ: डिझेल इंजिन प्रेमींसाठी आनंदाची बातमी ही की, अलीकडेच लाँच झालेले HX 8 आणि HX 10 ऑटोमॅटिक व्हेरिएंट्स जुन्याच किमतीत उपलब्ध असतील. मात्र, HX 2, HX 5, HX 5 ऑटोमॅटिक आणि HX 7 या चार मॉडेल्सच्या किमतीत प्रत्येकी ८,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

इंजिनमधील ताकद कायम

किमती बदलल्या असल्या तरी Hyundai Venue च्या इंजिन क्षमतेत कोणताही बदल नाही. यात १.२ लीटर पेट्रोल (८८ एचपी), १.० लीटर टर्बो पेट्रोल (१२० एचपी) आणि १.५ लीटर डिझेल (११६ एचपी) असे दमदार पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

ह्युंदाईने आपल्या ‘N Line’ सिरीजच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत, मात्र रेग्युलर पेट्रोल मॉडेल्समध्ये २०,००० रुपयांपर्यंतची वाढ झाल्याने मध्यमवर्गीय ग्राहकांच्या बजेटवर याचा परिणाम होऊ शकतो.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या