Home / क्रीडा / IPL 2026 : अभिषेक शर्माला मोठा दणका! ठोठावला मॅच फीचा 25 टक्के दंड; कारण काय?

IPL 2026 : अभिषेक शर्माला मोठा दणका! ठोठावला मॅच फीचा 25 टक्के दंड; कारण काय?

Abhishek Sharma fined 25 percent match fee IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 6 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR)...

By: Team Navakal
Abhishek Sharma fined 25 percent match fee IPL 2026
Social + WhatsApp CTA

Abhishek Sharma fined 25 percent match fee IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 6 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) शानदार विजय मिळवल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सलामीवीर अभिषेक शर्मा याच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अभिषेकला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच त्याच्या खात्यात 1 डिमेरिट पॉईंटही जोडण्यात आला आहे.

नेमकी कारवाई कशासाठी?

आयपीएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, अभिषेक शर्माने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.3 चे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. हे कलम मैदानात अश्लील किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्याशी संबंधित आहे. सामन्यादरम्यान अभिषेकने वापरलेली भाषा स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली किंवा प्रेक्षकांना ऐकू गेली, ज्याची गंभीर दखल मॅच रेफ्रींनी घेतली आहे. हा ‘लेव्हल 1’ चा गुन्हा असल्याने मॅच रेफ्रींचा निर्णय अंतिम मानला जातो.

वादग्रस्त बाद होणे ठरले कारण?

कारवाईचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी, वरुण चक्रवर्तीने घेतलेल्या एका वादग्रस्त कॅचनंतर अभिषेकने व्यक्त केलेला संताप हे त्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यूमध्ये कॅचबद्दल शंका असूनही त्याला बाद ठरवले होते. मैदाबाहेर जाताना अभिषेकने रागाच्या भरात काही अपशब्द वापरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फॉर्ममध्ये परतला अभिषेक

कारवाई झाली असली तरी, या सामन्यात अभिषेक शर्मा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतलेला पाहायला मिळाला. आरसीबीविरुद्धच्या खराब सुरुवातीनंतर त्याने कोलकात्याविरुद्ध अवघ्या 21 चेंडूंमध्ये 48 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. अभिषेकच्या या तुफानी फलंदाजीमुळे हैदराबादने 226 धावांचा डोंगर उभा केला आणि कोलकात्याचा 161 धावांवर खुर्दा पाडत विजय निश्चित केला.

सनरायझर्स हैदराबादचा पुढील सामना आता 5 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) त्यांच्या घरच्या मैदानावर होणार आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या