Upcoming Electric Cars India 2026 : भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठ सध्या एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांचा ओढा आता इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वेगाने वाढत आहे. हेच ओळखून दिग्गज कंपन्या २०२६ मध्ये मध्यमवर्गीय बजेटपासून ते प्रीमियम लक्झरीपर्यंत अनेक नवनवीन मॉडेल्स उतरवण्यास सज्ज आहेत. यंदाच्या वर्षी लाँच होणाऱ्या ५ प्रमुख इलेक्ट्रिक कार्सवर एक नजर टाकूया:
१. Honda 0 Alpha
Honda कंपनी भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या नवीन पिढीतील पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या या गाडीची चाचणी (Testing) सुरू असून, ही एक जागतिक दर्जाची SUV असणार आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ही कार हायटेक फीचर्ससह बाजारात येईल.
२. Toyota Urban Cruiser Ebella
Toyota आपली पहिली इलेक्ट्रिक SUV ‘Ebella’ लाँच करून या स्पर्धेत दमदार एन्ट्री करणार आहे. ही कार प्रामुख्याने Maruti च्या E-Vitara प्लॅटफॉर्मवर आधारित असली, तरी टोयोटाने यामध्ये स्वतःचे खास डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे.
३. Vinfast MP 7
व्हिएतनामची प्रसिद्ध कंपनी Vinfast एप्रिल महिन्यात भारतीय बाजारपेठेत आपले पहिले पाऊल टाकेल. त्यांची ‘MP 7’ ही एक फॅमिली कार (3-Row MPV) असून, ती शहर आणि हायवे अशा दोन्ही प्रवासासाठी अत्यंत सोयीस्कर ठरेल. प्रामुख्याने खासगी वापरासाठी ही कार डिझाइन करण्यात आली आहे.
४. TATA Sierra EV
टाटाची सर्वात बहुप्रतिक्षित कार म्हणजे ‘Sierra EV’. मे २०२६ च्या सुमारास ही कार रस्त्यावर दिसू शकते. जुन्या सिएराचा आयकॉनिक लूक आणि आधुनिक एलईडी लाईट बारचे कॉम्बिनेशन या कारला अतिशय प्रीमियम लूक देते. Harrier EV पेक्षा ही कार थोडी वेगळी आणि स्टायलिश असेल.
५. TATA Tiago EV Facelift
टाटाची सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago आता नवीन रुपात येत आहे. या ‘फेसलिफ्ट’ मॉडेलमध्ये नवीन हेडलाईट्स, स्लिम DRL आणि नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स पाहायला मिळतील. लूकसोबतच या कारची रेंज आणि परफॉर्मन्समध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – USA Iran War: तेहरानवर अमेरिकेचा भीषण हल्ला! इराणचे बडे लष्करी अधिकारी मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा










