Home / लेख / Best 7 Seater Cars: मोठ्या कुटुंबासाठी स्वस्त आणि मस्त कार! 8 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ ७ सीटर गाड्या; मायलेजमध्येही आहेत भारी

Best 7 Seater Cars: मोठ्या कुटुंबासाठी स्वस्त आणि मस्त कार! 8 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ ७ सीटर गाड्या; मायलेजमध्येही आहेत भारी

Best 7 Seater Cars Under 8 Lakh: भारतीय रस्त्यांवर सध्या मोठ्या कुटुंबासाठी सोयीस्कर अशा ७ सीटर गाड्यांची क्रेझ वाढत आहे....

By: Team Navakal
Best 7 Seater Cars
Social + WhatsApp CTA

Best 7 Seater Cars Under 8 Lakh: भारतीय रस्त्यांवर सध्या मोठ्या कुटुंबासाठी सोयीस्कर अशा ७ सीटर गाड्यांची क्रेझ वाढत आहे. अनेकदा बजेटमुळे लोक अशा गाड्या घेण्यास कचरतात, मात्र ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आता ८ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतही दमदार फीचर्स आणि उत्तम मायलेज देणाऱ्या कार उपलब्ध आहेत. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही लोकप्रिय ठरणाऱ्या या गाड्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

१. मारुति सुझुकी ईको (Maruti Suzuki Eeco)

कमी किमतीत जास्त जागा शोधणाऱ्यांसाठी मारुति ईको हा सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे. केवळ ५.४७ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होणारी ही गाडी ७ लोकांसाठी अतिशय आरामदायी आहे. यात ११९७ सीसीचे पेट्रोल इंजिन असून ती १९.७१ किमी प्रति लिटर इतके शानदार मायलेज देते. घरगुती वापर आणि व्यवसाय अशा दोन्ही कामांसाठी ही कार उपयुक्त ठरते.

२. रेनो ट्राइबर (Renault Triber)

बजेटमध्ये प्रीमियम लूक आणि फीचर्स हवे असतील तर रेनो ट्राइबरला पसंती दिली जाते. ५.७६ लाख रुपयांपासून सुरू होणारी ही एमपीव्ही आपल्या स्टायलिश डिझाइनसाठी ओळखली जाते. यात ९९९ सीसीचे इंजिन असून ते ७१ बीएचपी पॉवर जनरेट करते. विशेष म्हणजे ही कार २० किमी प्रति लिटरचे जबरदस्त मायलेज देते.

३. निसान ग्रेवाइट (Nissan Gravite)

निसानची ग्रेवाइट ही देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर गाड्यांपैकी एक आहे. ५.६५ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ही कार उपलब्ध आहे. ९९९ सीसी इंजिन असलेली ही एमपीव्ही १९.६ किमी प्रति लिटर मायलेज देते. ज्यांना कमी खर्चात आधुनिक फीचर्स असलेली फॅमिली कार हवी आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

४. महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)

मजबूत बांधणी आणि रांगड्या लूकसाठी ओळखली जाणारी महिंद्रा बोलेरो आजही ग्राहकांच्या पसंतीस उतरते. ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या या एसयूव्हीमध्ये १४९३ सीसीचे शक्तिशाली डिझेल इंजिन आहे. ही गाडी ७४.९६ बीएचपी पॉवर देते आणि १६ किमी प्रति लिटरचे मायलेज प्रदान करते. खराब रस्ते आणि लांबच्या प्रवासासाठी ही गाडी अत्यंत सुरक्षित मानली जाते.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या