Home / महाराष्ट्र / Pune Police Extortion Case: पुण्यात खाकीला काळिमा! प्राचार्याला ब्लॅकमेल करणाऱ्या ‘रील स्टार’ महिला पोलिसासह 3 जण निलंबित; ७ लाखांची केली होती वसुली

Pune Police Extortion Case: पुण्यात खाकीला काळिमा! प्राचार्याला ब्लॅकमेल करणाऱ्या ‘रील स्टार’ महिला पोलिसासह 3 जण निलंबित; ७ लाखांची केली होती वसुली

Pune Police Extortion Case: पुणे शहर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे खाकी वर्दीची मान पुन्हा एकदा खाली गेली आहे. एका...

By: Team Navakal
Pune Police Extortion Case
Social + WhatsApp CTA

Pune Police Extortion Case: पुणे शहर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे खाकी वर्दीची मान पुन्हा एकदा खाली गेली आहे. एका नामांकित शिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून ७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत हे कडक पाऊल उचलले आहे.

नेमके प्रकरण काय?

पुण्यातील एका महिला प्राचार्याला गाठून आरोपी पोलिसांनी त्यांना ‘पोक्सो’ (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. जर तुम्ही ७ लाख रुपये दिले नाहीत, तर तुम्हाला अटक केली जाईल आणि तुमची सर्वत्र बदनामी होईल, अशी भीती या पोलिसांनी दाखवली. अटकेच्या दहशतीखाली असलेल्या प्राचार्यांनी ही मोठी रक्कम पोलिसांच्या हवाली केली.

‘रील स्टार’ पोलिसाचा प्रताप

या प्रकरणात सर्वात जास्त चर्चा ही ‘रील स्टार’ आणि दामिनी मार्शल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली हिंगे हिची होत आहे. ती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.

  • निलंबित कर्मचारी: अजित बडे, सुदाम तायडे आणि सोनाली हिंगे.
  • ठिकाण: हे सर्व कर्मचारी शिवाजीनगर पोलीस स्टेशनशी संबंधित आहेत.

अशी फुटली वाचा

पैसे दिल्यानंतर प्राचार्याला हा सर्व प्रकार संशयास्पद वाटू लागला. त्यांनी भीती बाजूला सारून थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. तक्रार प्राप्त होताच पोलीस आयुक्तांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासात या तिन्ही पोलिसांचा सहभाग उघड झाल्यानंतर, त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या