Home / मनोरंजन / Shefali Bagga On Dating Rumors : युझवेंद्र चहलसोबतच्या ‘डेटिंग’च्या चर्चांवर शेफाली बग्गा स्पष्टच बोलली; म्हणाली, “मला विराटसारखाच पार्टनर हवा!”

Shefali Bagga On Dating Rumors : युझवेंद्र चहलसोबतच्या ‘डेटिंग’च्या चर्चांवर शेफाली बग्गा स्पष्टच बोलली; म्हणाली, “मला विराटसारखाच पार्टनर हवा!”

Shefali Bagga On Dating Rumors : ‘बिग बॉस १३’ फेम प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर शेफाली बग्गा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या...

By: Team Navakal
Shefali Bagga On Dating Rumors
Social + WhatsApp CTA

Shefali Bagga On Dating Rumors : ‘बिग बॉस १३’ फेम प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर शेफाली बग्गा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि शेफाली बग्गा यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या होत्या. मात्र, आता स्वतः शेफालीने या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगत त्यावर पडदा टाकला आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने तिची पसंती स्पष्ट करताना तिला विराट कोहलीसारखा आयुष्याचा जोडीदार हवा असल्याचे विधान केले आहे.

युजवेंद्र चहलसोबतच्या अफवांवर संताप-
एका मनोरंजन वाहिनीशी संवाद साधताना शेफालीने युजवेंद्र चहलसोबतच्या डेटिंगच्या बातम्यांवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की, “या प्रश्नांना उत्तर देऊन आता मी थकले आहे. समाजात लोकांचे विचार आजही संकुचित आहेत. एखाद्या व्यक्तीसोबत रात्रीच्या जेवणासाठी जाणे म्हणजे ‘डेटिंग’ असा अर्थ काढला जातो. तो केवळ एक सामान्य पापाराझी व्हिडिओ होता, परंतु लोकांनी त्यावर तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली. आमच्यातील मैत्रीचे नाते काय आहे, हे आम्हाला ठाऊक आहे आणि लोकांच्या बोलण्याने मला काहीही फरक पडत नाही.”

जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा आणि विराट कोहलीचा आदर्श-
शेफालीने पुढे असेही स्पष्ट केले की, तिला कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करण्याची इच्छा नाही. आपल्या मनातील भावना व्यक्त करताना ती म्हणाली, “मी विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांची मोठी चाहती आहे, परंतु लग्नासाठी ते आता पर्याय राहिलेले नाहीत. इतर अनेक क्रिकेटपटू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. मला असा जीवनसाथी हवा आहे जो माझी काळजी घेईल, संवेदनशील असेल आणि मला पुरेसा वेळ देईल. विराट कोहली ज्या प्रकारे आपल्या व्यस्त वेळापत्रकातून अनुष्का शर्मासाठी वेळ काढतो आणि तिचे कौतुक करतो, तो आदर्श मला भावतो. नात्यात अशा छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व असते.”

कोण आहे शेफाली बग्गा-
शेफाली बग्गा हिने ‘बिग बॉस १३’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता, जिथे तिची शहनाज गिलसोबतची मैत्री गाजली होती. सद्यस्थितीत ती क्रीडा निवेदिका (Sports Presenter) म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत यशस्वीपणे कार्यरत आहे. दुसरीकडे, भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०२० मध्ये धनश्री वर्माशी विवाह केला होता. मात्र, २०२५ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेत आपला संसार संपवला.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या