Home / क्रीडा / MI vs CSK : आयपीएल २०२६: संजू सॅमसनचे वादळी शतक आणि अकील हुसैनची फिरकी; चेन्नईचा मुंबईवर १०३ धावांनी ऐतिहासिक विजय..

MI vs CSK : आयपीएल २०२६: संजू सॅमसनचे वादळी शतक आणि अकील हुसैनची फिरकी; चेन्नईचा मुंबईवर १०३ धावांनी ऐतिहासिक विजय..

MI vs CSK : आयपीएलच्या ३३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा १०३ धावांनी धुव्वा उडवत एकतर्फी...

By: Team Navakal
MI vs CSK :
Social + WhatsApp CTA

MI vs CSK : आयपीएलच्या ३३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा १०३ धावांनी धुव्वा उडवत एकतर्फी विजय नोंदवला आहे. संजू सॅमसनचे दिमाखदार नाबाद शतक आणि अकील हुसैनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने हा विजय संपादन केला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत मोठी झेप घेत पाचवे स्थान पटकावले आहे. धावांच्या अंतराचा विचार करता, चेन्नईने मुंबईविरुद्ध मिळवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि वर्चस्व गाजवणारा विजय ठरला आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार संजू सॅमसनने सुरुवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चहूबाजूंनी फटकेबाजी केली. सॅमसनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावत नाबाद १०१ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईला २० षटकांत २०७ धावांचा डोंगर उभा करता आला. विशेष म्हणजे, चेन्नईचे इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरत असताना सॅमसनने एका बाजूने खिंड लढवत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.

२०८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांतच मुंबईला धक्के देण्यास सुरुवात केली. अवघ्या ११ धावांवर मुंबईचे तीन प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा धडाकेबाज फलंदाज क्विंटन डी कॉक या सामन्यात शून्यावर बाद झाला. हार्दिक पांड्यासह मुंबईचे तब्बल आठ फलंदाज धावसंख्येचा दुहेरी टप्पाही ओलांडू शकले नाहीत, ज्यामुळे मुंबईचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.

मुंबईकडून केवळ सूर्यकुमार यादव (३६ धावा) आणि तिलक वर्मा (३७ धावा) यांनी काही काळ प्रतिकार केला, मात्र त्यांनाही मोठी भागीदारी करण्यात अपयश आले. चेन्नईच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो अकील हुसैन. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर मुंबईच्या फलंदाजांना जखडून ठेवले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या