Home / महाराष्ट्र / Mumbai Crime : नाशिकनंतर आता मुंबईतही ‘कॉर्पोरेट’ जिहाद? कॉर्पोरेट ऑफिसमधील धक्कादायक संवादाने मुंबईत खळबळ!

Mumbai Crime : नाशिकनंतर आता मुंबईतही ‘कॉर्पोरेट’ जिहाद? कॉर्पोरेट ऑफिसमधील धक्कादायक संवादाने मुंबईत खळबळ!

Mumbai Crime : नाशिक जिल्ह्यातील भोंदूगिरी आणि आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरण ताजे असतानाच, आता मुंबईतही अशाच स्वरूपाची...

By: Team Navakal
Mumbai Crime
Social + WhatsApp CTA

Mumbai Crime : नाशिक जिल्ह्यातील भोंदूगिरी आणि आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरण ताजे असतानाच, आता मुंबईतही अशाच स्वरूपाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बांधकाम क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत कार्यरत असलेल्या १९ वर्षीय तरुणीला कार्यालयातीलच एका सहकाऱ्याने अश्लील संदेश आणि छायाचित्रे पाठवून तिचे मानसिक व लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नाशिकमध्ये सध्या भोंदूगिरीच्या घटनांचे सत्र सुरू असून, निफाड तालुक्यातील धरणगाव येथील एका स्वयंघोषित बाबाचे संतापजनक कृत्य उजेडात आले आहे. दुसरीकडे, नाशिकमधील एका मोठ्या आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करून त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर, आता मुंबईतील आग्रीपाडा येथे घडलेल्या या नव्या प्रकारामुळे “नाशिकपाठोपाठ मुंबईतही ‘कॉर्पोरेट जिहाद’ची पाळेमुळे रुजत आहेत का?” असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणी ही एका बांधकाम कंपनीत नोकरीला आहे. तिथेच काम करणाऱ्या ‘अश्रफ’ नावाच्या तरुणाने गेल्या काही महिन्यांपासून तिला लक्ष्य केले होते. संशयित आरोपी अश्रफ याने पीडितेच्या मोबाइलवर वारंवार अश्लील संदेश (Messages), आक्षेपार्ह छायाचित्रे आणि अश्लील व्हिडिओ पाठवत होता. सुरुवातीला पीडितेने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीचा त्रास आणि छळवणूक वाढतच गेल्याने अखेर तिने धैर्याने पोलिसांत धाव घेतली.

मुंबईत ‘कॉर्पोरेट’ छळवणुकीचा संतापजनक प्रकार; ‘हिंदू मुलींना मुस्लिम तरुणच आवडतात’ म्हणत आरोपीने मागितले शरीरसुख-
आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम कंपनीत कार्यरत असलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या छळवणूक प्रकरणातील तपशील जसजसे समोर येत आहेत, तसतसे या घटनेतील दाहकता अधिक स्पष्ट होत आहे. आरोपी अश्रफ याने पीडित तरुणीकडे केवळ तिच्या वैयक्तिक छायाचित्रांचीच मागणी केली नाही, तर तिला लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा फोनवरून उघडपणे व्यक्त केली. या धक्कादायक प्रकाराबाबत पीडितेने नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालात (FIR) अत्यंत खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

अधिकच्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला ‘लव्ह फ्रेंडशिप’ (प्रेमसंबंधातील मैत्री) करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवताना तरुणीला सांगितले की, त्याने यापूर्वी तिच्या इतर मैत्रिणींशीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आणि पीडितेचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी त्याने या गोष्टींचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाला जातीय वळण मिळाल्याचेही एफआयआरमधील संवादावरून दिसून येत आहे. जेव्हा पीडित तरुणीच्या मैत्रिणींनी आरोपीला ही मुलगी ‘हिंदू’ असल्याचे सांगताच आरोपीने अत्यंत उद्दामपणे उत्तर दिले. “आजकाल हिंदू मुलींना मुस्लिम तरुणच जास्त आवडतात,” असे विधान करत त्याने आपल्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या या विधानामुळे आणि वागणुकीमुळे या प्रकरणाला आता गांभीर्याने घेतले जात असून, हे केवळ छळवणुकीचे प्रकरण नसून यामागे काही विशिष्ट विचारसरणी किंवा कट आहे का, याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

तरुणीच्या प्रसंगावधानामुळे नराधमाचे कारस्थान उघड; आग्रीपाडा पोलिसांकडून विकृत सहकाऱ्याला बेड्या-
महालक्ष्मी परिसरातील एका बांधकाम कंपनीत कार्यरत असलेल्या १९ वर्षीय तरुणीने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे एका विकृत तरुणाचे काळं कृत्य उघडकीस आले आहे. पीडित तरुणीला अश्लील भाषेत धमकावणाऱ्या आणि शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अश्रफ नावाच्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार, पाठलाग करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी फेब्रुवारी महिन्यापासून महालक्ष्मी येथील एका बांधकाम कंपनीत ‘टेलीकॉलर’ म्हणून नोकरीला लागली होती. आरोपी अश्रफ हा देखील याच कंपनीत कामाला होता. त्याने कंपनीच्या अधिकृत ‘व्हॉट्सॲप ग्रुप’चा गैरवापर करून पीडितेचा वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक मिळवला. त्यानंतर त्याने पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली.

मात्र, पीडित तरुणी या दबावाला बळी पडली नाही. आरोपीचे वर्तन संशयास्पद आणि विकृत असल्याचे लक्षात येताच तिने अत्यंत हुशारीने पाऊल उचलले. तिने आपल्या शेजाऱ्याचा भ्रमणध्वनी वापरून आरोपीचे सर्व ‘व्हॉट्सॲप कॉल्स’ रेकॉर्ड केले. या रेकॉर्डिंगमुळे आरोपीच्या अश्लील मागणीचे आणि दाव्यांचे भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले. तरुणीच्या या धाडसामुळेच आरोपीचे पितळ उघडे पडले आणि पोलिसांना कारवाई करणे सोपे झाले.

पोलीस तपासात आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आरोपी अश्रफ याने केवळ एकाच तरुणीला लक्ष्य केले नव्हते, तर त्याने कंपनीतील आणि संपर्कातील इतरही अनेक मुलींना अशाच प्रकारचे अश्लील कॉल्स करून त्यांची छळवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या