Home / महाराष्ट्र / Dhirendra Shastri Controversy : “अशा भोंदू बाबांना मोठं करणाऱ्या राजकारण्यांना सरळ केलं पाहिजे!” धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावर संभाजीराजे आक्रमक

Dhirendra Shastri Controversy : “अशा भोंदू बाबांना मोठं करणाऱ्या राजकारण्यांना सरळ केलं पाहिजे!” धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावर संभाजीराजे आक्रमक

Dhirendra Shastri Controversy : नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण...

By: Team Navakal
Dhirendra Shastri Controversy
Social + WhatsApp CTA

Dhirendra Shastri Controversy : नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट शेअर करत धीरेंद्र शास्त्री आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या नेत्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

Dhirendra Shastri Controversy : संभाजीराजे छत्रपती यांचा संताप आणि मागणी

संभाजीराजे यांनी धीरेंद्र शास्त्री यांना ‘भोंदू बाबा’ म्हणत राज्य सरकारकडे त्यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहेत, तिथल्याच छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली होती. ज्याला आपल्या राज्याचा इतिहास माहित नाही, तो महाराष्ट्रात येऊन महाराजांचा खोटा आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतोय.”

संभाजीराजे पुढे म्हणाले की, “महाराज लढाया करून थकले होते, असे हा व्यक्ती म्हणतो आणि लोक समोर बसून टाळ्या वाजवतात, हे दुर्दैवी आहे. अशा भोंदूंना मोठे करणाऱ्या राजकारण्यांना आधी सरळ केले पाहिजे. राज्य सरकारने या व्यक्तीला महाराष्ट्रात कार्यक्रम घेण्यास त्वरित बंदी घालावी.”

Dhirendra Shastri Controversy : काय होते धीरेंद्र शास्त्रींचे वादग्रस्त विधान?

नागपूरमधील कथेत बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, “छत्रपती शिवाजी महाराज लढाया करून थकले होते. त्यानंतर त्यांनी समर्थ रामदास स्वामींना राजपाट सांभाळण्याची विनंती केली होती.” या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असून महाराजांचा चुकीचा इतिहास मांडल्याचा संताप व्यक्त होत आहे.

Dhirendra Shastri Controversy : वादानंतर धीरेंद्र शास्त्रींची माफी

वाढता विरोध पाहून धीरेंद्र शास्त्री यांनी अखेर या प्रकरणावर माफी मागितली आहे. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. ते आपल्या गुरूंबद्दल किती समर्पित होते, हे मला सांगायचे होते. मात्र, हिंदू विरोधी शक्तींनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. तरीही माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो.”

हे देखील वाचा – White House Dinner Shooting : अमेरिका हादरली! व्हाईट हाऊसच्या डिनर पार्टीत गोळीबार करणारा कोल ॲलन नक्की आहे तरी कोण?

Web Title:
संबंधित बातम्या