Dell XPS Launch: लॅपटॉप विश्वातील आघाडीची कंपनी डेलने भारतीय ग्राहकांसाठी आपले दोन सर्वात प्रगत लॅपटॉप Dell XPS 14 आणि XPS 16 अधिकृतपणे बाजारपेठेत उतरवले आहेत. हे दोन्ही लॅपटॉप इंटेल कोअर अल्ट्रा 3 सिरीजच्या अत्याधुनिक प्रोसेसरने सज्ज असून यामध्ये युजर्सना इंटेल कोअर अल्ट्रा X7 358H पर्यंतचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डिझाईन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हे लॅपटॉप अत्यंत प्रीमियम आहेत.
Dell XPS Launch: किंमत आणि जबरदस्त ऑफर्स
भारतीय बाजारात Dell XPS 14 ची सुरुवातीची किंमत 2,05,990 रुपये ठेवण्यात आली आहे, तर मोठ्या स्क्रीनच्या XPS 16 मॉडेलची किंमत 2,78,550 रुपयांपासून सुरू होते.
ग्राहकांसाठी कंपनीने काही आकर्षक ऑफर्स देखील दिल्या आहेत:
- कॅशबॅक: एचडीएफसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय सारख्या बँकांच्या कार्डवर 15,000 रुपयांपर्यंत (10%) सूट मिळू शकते.
- ईएमआय: 9 आणि 12 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयची सुविधा उपलब्ध आहे.
- एडिशनल बेनिफिट्स: केवळ 999 रुपयांत 1 वर्षाचे ‘अपघाती नुकसान संरक्षण’ (Accidental Damage Protection) आणि डेल बॅकपॅक मिळवता येईल. तसेच, 1,999 रुपयांत जेबीएल हेडफोन्सचा पर्यायही दिला आहे.
Dell XPS 14 चे फीचर्स
- डिस्प्ले: यात 14 इंचचा इन्फिनिटी एज डिस्प्ले आहे, ज्यात 2K एलसीडी किंवा 2.8K ओलेड टचस्क्रीनचा पर्याय मिळतो.
- परफॉर्मन्स: हा लॅपटॉप विंडोज 11 होमवर आधारित असून यामध्ये 32GB रॅम आणि 1TB एसएसडी स्टोरेज दिले आहे.
- कॅमेरा आणि साऊंड: व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा वेबकॅम असून डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह क्वाड स्पीकर्स देण्यात आले आहेत.
- बॅटरी: 70Wh क्षमतेची बॅटरी असून 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Dell XPS 16 चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: यामध्ये 16 इंचचा मोठा 3.2K ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर: हा लॅपटॉप इंटेल कोअर अल्ट्रा X7 358H प्रोसेसरवर चालतो.
- कनेक्टिव्हिटी: वेगवान कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय 7, ब्लूटूथ 6.0 आणि 3 थंडरबोल्ट 4 पोर्ट्स देण्यात आले आहेत.
- इतर वैशिष्ट्ये: यात हॅप्टिक ग्लास टचपॅड, बॅकलिट कीबोर्ड आणि जबरदस्त ऑडिओ आउटपुटसाठी प्रगत स्पीकर्स आहेत.
हे दोन्ही लॅपटॉप डेलच्या अधिकृत वेबसाईटसह डेल एक्सक्लुझिव्ह स्टोर्स आणि मोठ्या रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.
हे देखील वाचा –










