Maharashtra Vidhan Parishad Election Process: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीवरून खळबळ माजली आहे. 12 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान होणार असून, महाविकास आघाडीत (MVA) समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. संख्याबळानुसार आघाडीचा एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, मात्र ठाकरे गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनंही आपला दावा ठोकला आहे. यामुळे ही निवडणूक आता मित्रपक्षांमधील संघर्षाचे मैदान ठरण्याची शक्यता आहे.
Vidhan Parishad Election Process: भारतात केवळ 6 राज्यांत विधान परिषद
देशातील सर्वच राज्यांमध्ये विधान परिषद नाही. सध्या केवळ महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या 6 राज्यांत हे सभागृह अस्तित्वात आहे. एखादे नवीन सभागृह स्थापन करायचे असेल किंवा बरखास्त करायचे असेल, तर विधानसभेने दोन-तृतीयांश बहुमताने ठराव मंजूर करून तो संसदेकडे पाठवावा लागतो.
विधान परिषद: राज्याचे वरीष्ठ सभागृह
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 171 (1) नुसार विधान परिषदेची तरतूद करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे देशात राज्यसभा असते, त्याचप्रमाणे राज्यात विधान परिषद हे वरीष्ठ सभागृह मानले जाते.
Vidhan Parishad Election Process: सभागृहाची रचना:
- सदस्य संख्या: विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक-तृतीयांशपेक्षा जास्त सदस्य विधान परिषदेत असू शकत नाहीत. महाराष्ट्रात ही संख्या सध्या 78 आहे.
- कार्यकाळ: हे सभागृह कधीही विसर्जित होत नाही. प्रत्येक 2 वर्षांनी एक-तृतीयांश सदस्य निवृत्त होतात.
- निवड प्रक्रिया: एकूण 78 सदस्यांपैकी:
- 30 सदस्य आमदारांमार्फत निवडले जातात.
- 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत.
- 7 सदस्य पदवीधर तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमार्फत.
- 12 सदस्य राज्यपालांकडून नियुक्त केले जातात.
Vidhan Parishad Election Process: निवडणूक नेमकी कशी होते?
विधान परिषद निवडणुकीची पद्धत सामान्य निवडणुकांपेक्षा वेगळी असते. येथे ‘पसंतीक्रम मतदान’ पद्धतीचा वापर केला जातो.
- कोटा पद्धत: निवडणूक आयोग विजयासाठी एक ठराविक मतांचा कोटा निश्चित करतो.
- पसंतीक्रम: मतदार उमेदवारांना आपल्या आवडीनुसार 1, 2, 3 असा पसंतीक्रम देतात. ज्याला पहिल्या पसंतीची मते जास्त, तो विजयी होतो.
- गुप्त मतदान: ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. राज्यसभेत मतदान उघड असते, पण विधान परिषदेत ते ‘गुप्त’ असते. यामुळेच ‘क्रॉस वोटिंग’चा (पक्षांतर करून मतदान) धोका सर्वाधिक असतो.
हे देखील वाचा – UAE OPEC Exit: भारतासाठी गूड न्यूज! ओपेकच्या बंधनातून युएई मुक्त; आता स्वस्त आणि सुरक्षित दराने मिळणार कच्चे तेल











