Home / लेख / Renault Triber 2026: मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! रेनोची स्वस्त ७ सीटर कार नव्या अवतारात लाँच; पाहा किंमत आणि फिचर्स

Renault Triber 2026: मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! रेनोची स्वस्त ७ सीटर कार नव्या अवतारात लाँच; पाहा किंमत आणि फिचर्स

Renault Triber 2026: भारतीय रस्त्यांवर मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती असलेल्या रेनो ट्रायबरला कंपनीने आता नवीन अपडेटसह बाजारात उतरवले आहे. विशेष...

By: Team Navakal
Renault Triber 2026
Social + WhatsApp CTA

Renault Triber 2026: भारतीय रस्त्यांवर मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती असलेल्या रेनो ट्रायबरला कंपनीने आता नवीन अपडेटसह बाजारात उतरवले आहे. विशेष म्हणजे, अतिशय वाजवी किमतीत ७ लोकांच्या प्रवासाची सोय करणाऱ्या या कारमध्ये आता अधिक सुखसोयी आणि आधुनिक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ही कार केवळ स्वस्तच नाही, तर आता ती अधिक व्यावहारिकही झाली आहे.

किंमत आणि व्हेरियंट

नव्या रेनो ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत ५.८० लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ती ८ लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार ऑथेंटिक, इव्होल्यूशन, टेक्नो आणि इमोशन अशा चार मुख्य प्रकारांत उपलब्ध आहे. ज्यांना ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी टॉप ‘इमोशन’ व्हेरियंटमध्ये एएमटी (AMT) चा पर्याय देण्यात आला असून त्याची किंमत ८.४७ लाख रुपये आहे.

नव्या अपडेटमध्ये काय आहे खास?

२०२६ च्या या अपडेटमध्ये कंपनीने प्रवाशांच्या आरामावर विशेष भर दिला आहे:

  • सुलभ प्रवेश: तिसऱ्या रांगेत बसण्यासाठी दुसऱ्या रांगेच्या सीटला ‘वन-टच फोल्ड आणि टंबल’ फंक्शन दिले आहे, ज्यामुळे आत जाणे सोपे होईल.
  • विशाल बूट स्पेस: आता दुसऱ्या रांगेतील सीट पूर्णपणे सपाट (Flat Fold) करता येतात. यामुळे कारमध्ये तब्बल १०६५ लीटरची प्रचंड जागा सामान ठेवण्यासाठी मिळते.
  • आधुनिक केबिन: कारमध्ये २०.३२ सेमीची मोठी टचस्क्रीन देण्यात आली असून ती अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करते. याशिवाय ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचे फिचरही जोडले आहे.

व्हेरियंटनुसार नवीन फिचर्स

रेनोने प्रत्येक व्हेरियंटमध्ये काही ना काही नवीन दिले आहे. इव्होल्यूशन व्हेरियंटमध्ये आता स्टीयरिंगवर कंट्रोल्स आणि मागील रांगेत लॅम्प मिळतील. तर टेक्नो व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर सीट ॲडजस्टमेंट, इलेक्ट्रिकली फोल्ड होणारे आरसे (ORVM) आणि तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी १२ व्होल्टचा चार्जिंग सॉकेट दिला आहे.

इंजिन आणि सुरक्षा

कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात १.० लीटरचे पेट्रोल इंजिन मिळते, जे ७२ पीएसची पॉवर आणि ९६ एनएमचा टॉर्क जनरेट करते. सुरक्षेच्या बाबतीतही ही कार भक्कम असून यात ६ एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखे २१ स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा – 

Vidhan Parishad Election Process: विधान परिषद निवडणूक कशी होते? वाचा

UAE OPEC Exit: भारतासाठी गूड न्यूज! ओपेकच्या बंधनातून युएई मुक्त; आता स्वस्त आणि सुरक्षित दराने मिळणार कच्चे तेल

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या