Home / लेख / World’s Best Pancakes: जगातील टॉप 100 पॅनकेक्समध्ये भारतीय पदार्थांचा डंका! डोसा, अप्पम आणि मालपुआने मारली बाजी; पाहा संपूर्ण यादी

World’s Best Pancakes: जगातील टॉप 100 पॅनकेक्समध्ये भारतीय पदार्थांचा डंका! डोसा, अप्पम आणि मालपुआने मारली बाजी; पाहा संपूर्ण यादी

World’s Best Pancakes: पॅनकेक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मध किंवा सिरपसोबत खाल्ला जाणारा गोड पदार्थ येतो. पण जागतिक खाद्य नकाशावर...

By: Team Navakal
World’s Best Pancakes
Social + WhatsApp CTA

World’s Best Pancakes: पॅनकेक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मध किंवा सिरपसोबत खाल्ला जाणारा गोड पदार्थ येतो. पण जागतिक खाद्य नकाशावर भारताच्या कुरकुरीत डोशाने पॅनकेकच्या व्याख्येत मोठी झेप घेतली आहे. प्रसिद्ध फूड गाईड ‘टेस्टअॅटलस’ने एप्रिल 2026 ची जगातील ‘टॉप 100 पॅनकेक्स’ यादी जाहीर केली असून, यात भारतीय पदार्थांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

भारतीय पदार्थांची जागतिक भरारी

या यादीत भारताच्या केवळ डोशाचाच नाही, तर इतरही अनेक पारंपारिक पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ‘मसाला डोसा’ने जगातील पहिल्या 10 पदार्थांमध्ये स्थान मिळवले आहे.

यादीतील काही प्रमुख भारतीय पदार्थ:

  • मसाला डोसा: 6 वे स्थान
  • डोसा (तमिळनाडू): 15 वे स्थान
  • पेपर डोसा: 35 वे स्थान
  • अप्पम (केरळ): 60 वे स्थान
  • पेसरा डोसा (आंध्र प्रदेश): 63 वे स्थान
  • उत्तपम (तमिळनाडू): 74 वे स्थान
  • नीर डोसा (कर्नाटक): 84 वे स्थान
  • मालपुआ: 85 वे स्थान
  • रवा डोसा: 96 वे स्थान
  • पिठा (ओडिशा): 98 वे स्थान

का खास ठरले हे भारतीय ‘पॅनकेक्स’?

भारतीय पॅनकेक्स फक्त चवीसाठीच नाही, तर ते बनवण्याची पद्धत आणि आंबवण्याची प्रक्रिया यामुळे जगभरात वेगळे ठरतात. डोशाचे पीठ रात्रभर आंबवून त्यात येणारा विशिष्ट आंबटपणा आणि कुरकुरीतपणा ही भारतीय पाककलेची खासियत आहे. जगभरात पॅनकेक्स गोड सिरपसोबत खाल्ले जात असताना, भारतीय लोक हे पदार्थ सांबार आणि चटणीसोबत खाण्यास पसंती देतात.

विविधता आणि परंपरा

या यादीत जरी एका राज्याचा उल्लेख असला तरी, हे पदार्थ संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत. ओडिसाचा ‘पिठा’ पश्चिम बंगाल आणि आसाममध्येही आवडीने खाल्ला जातो. तर ‘मालपुआ’ हा केवळ लग्नसमारंभातच नाही, तर पुरीच्या जगन्नाथ मंदिरातही प्रसाद म्हणून अर्पण केला जातो.

जगातील इतर टॉप पदार्थ

या यादीत लाटवियाचा बटाट्यापासून बनवलेला ‘कार्तुपेलू पांकुकास’ हा पदार्थ पहिल्या क्रमांकावर आहे. फ्रान्सचे प्रसिद्ध ‘क्रेप्स’ (Crepes) दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत, तर चीनचा प्रसिद्ध स्ट्रीट फूड ‘जियानबिंग’ पाचव्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी देखील 2026 च्या सुरुवातीला मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि लखनौ सारख्या शहरांनी जागतिक खाद्य नकाशावर आपली मोहोर उमटवली होती. आता डोशाच्या या जागतिक यशामुळे भारतीय जेवणाची क्रेझ परदेशात पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा – 

Teena Choudhry Viral Video: ‘दीड तास पोलिसांकडे मागितली मदत, पण…’; गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या टीना चौधरींनी सांगितली त्या दिवशीची खरी हकीकत

Pune Rape Case News : पुण्यातील नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून स्वेच्छा दखल; खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या